CoronaVirus InKolhapur : जिल्ह्यात एकूण २७३ पॉझीटिव्ह, शाहूवाडीत सर्वाधिक ८२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:32 IST2020-05-23T18:30:58+5:302020-05-23T18:32:36+5:30
जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी १४ रुग्ण कोरोनाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकुण २७३ कोरोनाचे रुग्ण आहेत.

CoronaVirus InKolhapur : जिल्ह्यात एकूण २७३ पॉझीटिव्ह, शाहूवाडीत सर्वाधिक ८२
कोल्हापूर : जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी १४ रुग्ण कोरोनाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकुण २७३ कोरोनाचे रुग्ण आहेत.
सकाळी मिळालेल्या ७७४ अहवालापैकी दोन अहवाल पॉझीटिव्ह आले तर ६८0 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९१ अहवाल अजून मिळालेले नसून एक अहवाल नाकारण्यात आला आहे.
आजअखेर जिल्ह्यात एकूण २७३ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ८२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- १३, भुदरगड- २४, चंदगड- १८, गडहिंग्लज- १३, गगनबावडा- ५, हातकणंगले-३ , कागल- १, करवीर- १0, पन्हाळा-१५, राधानगरी- ४२, शाहूवाडी-८२, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १0, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१६ असे एकूण २५७ आणि मुंबइहून एकजण, कर्नाटकातून दोघे आणि आंध्रप्रदेशातून १ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण २६१ रुग्णांची नोंद आज सकाळी झाली आहे. त्यानंतर आणखी १२ जणांची वाढ झाल्याने आता एकुण रुग्णांची संख्या २७३ इतकी झाली आहे.