CoronaVirus: Four patients increase in Belgaum, two-year-old Kerala returns girl corona positive | CoronaVirus : बेळगावात दोन वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉझिटिव्ह,चार नवीन रुग्ण वाढले

CoronaVirus : बेळगावात दोन वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉझिटिव्ह,चार नवीन रुग्ण वाढले

ठळक मुद्देबेळगावात चार रुग्णांची वाढदोन वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉझिटिव्ह

बेळगाव : बेळगावात मंगळवारी १३ रुग्णांची वाढ झाल्या नंतर बुधवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली असून बुधवारी दुपारी चार नवीन रुग्ण वाढले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रुग्ण संख्या एकूण १४७ झाली आहे. त्यात ८ जण बागलकोट जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यावर बेळगावात उपचार सुरू आहेत.


नवीन चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत २ महिला, एक पुरुष तर एक दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. दोन वर्षीय बालिका केरळ रिटर्न आहे. याशिवाय दोघेजण महाराष्ट्र तर एक जण दिल्ली रिटर्न आहेत.

परराज्यातून आलेल्या आणि क्वारंटाइन झालेल्यांत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून बेळगाव जिल्ह्याचा आकडा सतत वाढत आहे. दोन दिवस एकने तर काल १३ ने आकडा वाढला होता, आज ४ ने वाढ झाली आहे.

राज्यातील आकडा देखील दररोज १०० ने वाढत असून बुधवारी नवीन १२२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील आकडा देखील २४०५ इतका झाला आहे.

 

Web Title: CoronaVirus: Four patients increase in Belgaum, two-year-old Kerala returns girl corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.