CoronaVirus : गडहिंग्लजमध्ये कोरोना तपासणीची सुविधा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:46 IST2020-06-08T11:37:04+5:302020-06-08T11:46:36+5:30
कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' हे अत्याधुनिक मशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणीची या मशिनची क्षमता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड ,कागल या तालुक्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे.

CoronaVirus : गडहिंग्लजमध्ये कोरोना तपासणीची सुविधा !
गडहिंग्लज - कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' हे अत्याधुनिक
मशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणीची या मशिनची क्षमता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड ,कागल या तालुक्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे.
कोल्हापूरनंतर तालुक्याच्या ठिकाणी प्रथमच स्वॅब तपासण्याची व्यवस्था झाली आहे.त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. येत्या ४ दिवसात प्रत्यक्ष स्वॅब तपासणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागत होते. एप्रिलमध्ये कोल्हापूर येथे तपासणीची व्यवस्था झाली.परंतु, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने कोल्हापूरच्या प्रयोग शाळेवरही ताण आला होता. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात मशिन बसवण्याची मागणी पुढे आली होती.
या मशीनला मोबाईल जोडलेला असून सिम कार्डचीही व्यवस्था आहे. त्यामुळे थेट मशीनमध्येच अहवाल पाहता येणे व पाठविणे शक्य आहे. त्यामुळे अहवाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे.