शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

CoronaVirus : कोरोना योध्द्यांच्या संरक्षणासाठी कोल्हापूरात फेसशिल्डची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 18:19 IST

भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने यांनी थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने अ‍ॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅबमार्फत केली आहे. या फेसशिल्डला कोरोना योध्द्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोना योध्द्यांच्या संरक्षणासाठी कोल्हापूरात फेसशिल्डची निर्मितीआदित्य माने यांचे डिझाईन : शासकीय, अशासकीय यंत्रणेकडून प्रतिसाद

कोल्हापूर : भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने यांनी थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने अ‍ॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅबमार्फत केली आहे. या फेसशिल्डला कोरोना योध्द्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.२४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणा झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. लॉकडाउनच्या काळात जनतेला अत्यावश्यक सेवा पुरविणे आणि त्या सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीला कोरोना संक्रमणापासून संरक्षण करणे अशी दुहेरी कसरत प्रशासनाला करावी लागू लागली. एन ९५ आणि पीपीई किटसचा तुटवडा असताना या संकटाचा सामना करणे यासाठी कोल्हापूरातील अ‍ॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅबने थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने फेसशिल्डचे डिझाईन तयार केले.लॅबने तयार केलेल्या या विशिष्टप्रकारच्या फेसशिल्डमुळे नाक आणि तोंडासह डोळे आणि कानाचेही संरक्षण होते. हे लक्षात आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे फेसशिल्ड एन ९५ च्या मास्कला चांगला पर्याय ठरणार याची खात्री पटली. यामुळे नाक, तोंड, कान आणि डोळ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण पुरविणारे ठरते, यामुळे प्रशासनाने २000 फेस शिल्डची मागणी केली आणि लॅबने तत्काळ पुरविली.

यासाठी लॅबला पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, केआयटी कॉलेजने सहकार्य केले आहे.कमीत कमी वेळेत निर्मितीकमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त फेसशिल्ड पुरविण्याचे काम थ्रीडी प्रिंटरमुळे शक्य झाले. अवघ्या आठ दिवसांत लॅबने २000 फेस शिल्डची मागणी तत्काळ पुरविली. फेसशिल्डची निर्मिती केल्याने प्रशासनावरील ताण बराचसा कमी होण्यास मदत झाली. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.

शासकीय आणि अशासकीय कार्यालये, खासगी संस्था यांच्या प्रोत्साहनामुळे फेसशिल्डची यशस्वी निर्मिती झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सीपीआर, खासगी रुग्णालय, कोल्हापूर अनॅस्थॅशिएस्टसारख्या खासगी संस्था, डॉक्टर्स, पारिचारिका, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला, वृध्द व्यक्ती यांना या फेसशिल्डचा मोठा फायदा होत आहे.- आदित्य माने,अ‍ॅबस्ट्रॅक्ट मटेरियल लॅब, कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीzpजिल्हा परिषदCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय