कोरोनाचा दिलासा, नवे रुग्ण ८१६, मृतांचा आकडा मात्र वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:42 AM2021-05-03T11:42:12+5:302021-05-03T11:43:19+5:30

CoronaVIrus Kolhapur : गेल्या आठवडाभरापासून सातत्याने रोज एक हजारावर नवे कोरोनाग्रस्त आढळण्याला रविवारी कांहीसा ब्रेक मिळाल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. रविवारी नवे ८१६ कोरोनाग्रस्त आढळले, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona's relief, 816 new patients, but the death toll continues to rise | कोरोनाचा दिलासा, नवे रुग्ण ८१६, मृतांचा आकडा मात्र वाढताच

कोरोनाचा दिलासा, नवे रुग्ण ८१६, मृतांचा आकडा मात्र वाढताच

Next
ठळक मुद्देकोरोनाचा दिलासा, नवे रुग्ण ८१६, मृतांचा आकडा मात्र वाढताच आठवडाभरानंतर संख्या हजारच्या खाली्

कोल्हापूर: गेल्या आठवडाभरापासून सातत्याने रोज एक हजारावर नवे कोरोनाग्रस्त आढळण्याला रविवारी कांहीसा ब्रेक मिळाल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. रविवारी नवे ८१६ कोरोनाग्रस्त आढळले, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या रविवारपासून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची व मृतांची संख्या वाढतच चालली होती. शुक्रवारी याचा १२५० असा उच्चांक झाला होता. शनिवारी देखील ११२३ जण नवे कोरोनाग्रस्त आढळले होते. रविवारी मात्र हा वाढत चाललेला आलेख कमी आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ७८७ जण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ६६० जण उपचार घेत आहेत. कोल्हापूर शहरात १७७ अशी सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तर शिरोळ तालुक्यात उच्चांकी ९३ रुग्ण सापडले आहेत. करवीर तालुक्यात ७८, तर हातकणंगलेत ६३ रुग्ण बाधित आढळले आहेत.

हातकणंगलेत सर्वाधिक मृत्यू

हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक ८ मृत्यू झाले आहेत. करवीरमध्येही सात मृत्यू झाले आहेत, तर गडहिंग्लज, कागल, राधानगरी, चंदगड, गगनबावड्यात एकही मृत्यू झालेला नाही.

चौकट
मृतांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त

मृतांमध्ये चाळिशीच्या आतील मृत्यू झालेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पाचगाव, कळंबा येथील पुरुष तर ३६ च्या आतील आहेत. हातकणंगले पारगाव येथील ३२ वर्षीय तरुण, इचलकरंजीतील ३५ वर्षीय, लातूर येथील ३८ वर्षीय, असे कर्ते तरुण डोळ्यादेखत कोरोनाने हिरावले आहेत.
चौकट

झालेले मृत्यू...
कोल्हापूर शहर : राजारामपुरी येथील ५८ वर्षीय पुरुष, टाकाळा येथील ५८ वर्षीय महिला, रमणमळा येथील ६१ वर्षीय पुरुष, शुक्रवारपेठ येथील ७६ वर्षीय पुरुष.

करवीर : पाचगाव येथील ४८ व ५५ वर्षीय पुरुष, सावर्डे येथील ४३ वर्षीय पुरुष, कळंबा येथील ३६ वर्षीय पुरुष, निगवे दुमाला येथील ६५ वर्षीय पुरुष, मोरेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष, हळदी येथील ७२ वर्षीय महिला.
हातकणंगले : शिरोली येथील ५५ वर्षीय महिला, विक्रमनगर इचलकरंजी येथील ३५ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील ७५ वर्षीय महिला, इचलकरंजी येथील ४९ वर्षीय पुरुष व ७९ वर्षीय महिला, कबनूर येथील ६० वर्षीय महिला, नवे पारगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, रुकडी येथील ५० वर्षीय पुरुष.

शिरोळ : राजापूरवाडी येथील ८७ वर्षीय पुरुष, दत्तवाड येथील ६१ वर्षीय पुरुष.
शाहूवाडी : येळवण येथील ४४ वर्षीय पुरुष, करंजोशी येथील ६३ वर्षीय महिला, भेडसगाव येथील ८४ वर्षीय पुरुष.

आजरा : सरंबळवाडी येथील ४४ वर्षीय महिला, उत्तूर येथील ५५ वर्षीय पुरुष.
भुदरगड : हंबरवाडी येथील ८५ वर्षीय पुरुष.

पन्हाळा : वारणा कोडोली येथील ६५ वर्षीय पुरुष, पुनाळ येथील ६० वर्षीय पुरुष.
सांगली : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील ६० वर्षीय पुरुष, स्टेशन रोड आरग मिरज येथील ७५ वर्षीय पुरुष, आटपाडी येथील ५४ वर्षीय महिला.

सातारा : कऱ्हाड येथील ४७ वर्षीय महिला.
लातूर : आंबुलगा येथील ३८ वर्षीय पुरुष.

रविवार २ मे
आजचे रुग्ण : ८१६

एकूण मृत्यू : ३४
जिल्ह्यातील मृत्यू : २९

इतर जिल्हा मृत्यू : ०५
उपचार घेत असलेले : ९६६०

आजचे डिस्चार्ज : ७८७
सर्वाधिक रुग्ण : कोल्हापूर शहर
कोल्हापूर शहर : १७७

शिरोळ : ९३
करवीर : ७८

हातकणंगले : ६३
कागल : ५०

चंदगड : ४१
कोल्हापूर शहर मृत्यू : ०४
तालुकानिहाय मृत्यू रुग्ण

करवीर : ०७ ७८
हातकणंगले : ०८ ६३

भुदरगड : ०१ ४५
पन्हाळा : ०२ २०

शिरोळ : ०२ ९३
आजरा : ०२ २७

शाहूवाडी : ०३ ३५
गडहिंग्लज : ०० ३७

चंदगड : ०० ४१
राधानगरी : ०० १३

कागल : ०० ५०
गगनबावडा : ०० २०

कोल्हापूर महापालिका : १७७

नगरपालिका : ७८
इतर जिल्हा : ३९

चौकट

शनिवारीही ११२३ नवे रुग्ण, तर ३७ मृत्यू

जिल्ह्यात चार दिवसांपासून हजारावर रुग्ण आढळण्याचा ट्रेन्ड शनिवारीही कायम राहिला. ११२३ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३७ जणांना जीव गमवावा लागला. यात कोल्हापूर शहरातील २४२ सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. ७८० जण कोरोनामुक्त बनले असून ९ हजार ६६५ जण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona's relief, 816 new patients, but the death toll continues to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.