वाठारात कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:39+5:302021-07-12T04:16:39+5:30

नवे पारगाव : वाठार (ता.हातकणंगले) येथे जय हनुमान युवा शक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर व वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र ...

Corona warriors felicitated at Wathara | वाठारात कोरोना योद्धांचा सत्कार

वाठारात कोरोना योद्धांचा सत्कार

नवे पारगाव : वाठार (ता.हातकणंगले) येथे जय हनुमान युवा शक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर व वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा सत्कार करण्यात आला. वारणेचे युवा नेते विश्वेश कोरे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, सरपंच तेजस्विनी वठारकर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, वारणा दूध संघाचे संचालक डॉ. मिलिंद हिरवे, मंडल अधिकारी अनिता खाडे, तलाठी श्यामराव पाटील, ग्रामसेवक एल. बी. पाटील, उपसरपंच राहुल पोवार, ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, गजेंद्र माळी, सुशीला चौगुले, रेश्मा शिंदे, रुकसाना नदाफ, अश्विनी कुंभार, सुजाता मगदुम, रावसाहेब शिंदे, पुष्पांजली क्षीरसागर, अनिता कुंभार, वैशाली शिंदे, सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.

११ वाठार सत्कार

फोटो ओळी : वाठार (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पवार व सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Corona warriors felicitated at Wathara