corona virus : शहरातील सर्वेक्षणात आढळले सहा पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:23 IST2020-10-08T12:21:32+5:302020-10-08T12:23:03+5:30
corona virus, positive patients, city survey, muncipaltycarporation, kolhapurnews माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ९८१ घरांचे आणि ४१४३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून संदर्भित केलेल्या २४ रुग्णांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

corona virus : शहरातील सर्वेक्षणात आढळले सहा पॉझिटिव्ह रुग्ण
ठळक मुद्देशहरातील आढळले सहा पॉझिटिव्ह रुग्ण माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण
कोल्हापूर : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ९८१ घरांचे आणि ४१४३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून संदर्भित केलेल्या २४ रुग्णांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
संपूर्ण शहरात सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये बुधवारी ३२ जणांचे स्वॅब घेतले असून यामध्ये आरटीपीसीआर केलेले २९ तर ॲन्टीजेन चाचणी केलेल्या तीन रुग्णांचा समावेश असून सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळलेले रुग्ण १४, कोमॉबीड आजार असलेले रुग्ण ३११ संदर्भित केलेले रुग्ण २४ असून संदर्भित केलेल्या रुग्णांपैकी कोरोना पॉझिटिव्ह आलेले सहा रुग्ण आहेत.