corona virus : व्हिक्टर पॅलेसकडून रुक्मिणीनगरात जाणारा मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:53 IST2020-07-29T18:50:40+5:302020-07-29T18:53:30+5:30
रुक्मिणीनगर परिसरातील हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्तमंदिर वळण ते वायचळ रोडवर ॲड. संतोष शहा यांचे घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला.

corona virus : व्हिक्टर पॅलेसकडून रुक्मिणीनगरात जाणारा मार्ग बंद
कोल्हापूर : रुक्मिणीनगर परिसरातील हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्तमंदिर वळण ते वायचळ रोडवर ॲड. संतोष शहा यांचे घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला.
ॲड. संतोष शहा यांचे घर ते हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड, अवजड, मालवाहू वाहनांकरिता बंद राहील. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी व इतर हलकी वाहने यांची रहदारी मोठ्या प्रमाणावर होत असून अपघात होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
त्या भागातील नागरिकांना या वाहतुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दीपक मिरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हा मार्ग बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक देशमुख यांनी तातडीने त्याची दखल घेत हा निर्णय घेतला.