corona virus : कोरोनाचे केवळ ३७२४ रुग्ण उरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 11:00 IST2020-10-15T10:57:03+5:302020-10-15T11:00:24+5:30
corona virus, kolhapurnews गेल्या दोन महिन्यांत प्रचंड संख्येने पॉझिटिव्ह येणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत कोल्हापूर जिल्ह्यात कमालीची घट होत असल्याचे चित्र बुधवारीही कायम राहिले आहे. जिल्ह्यात नवे रुग्ण आढळले असून २४ तासांमध्ये आठजणांचा मृत्यू झाला आहे. आता केवळ ३७२४ कोरोना रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.

corona virus : कोरोनाचे केवळ ३७२४ रुग्ण उरले
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांत प्रचंड संख्येने पॉझिटिव्ह येणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत कोल्हापूर जिल्ह्यात कमालीची घट होत असल्याचे चित्र बुधवारीही कायम राहिले आहे. जिल्ह्यात नवे रुग्ण आढळले असून २४ तासांमध्ये आठजणांचा मृत्यू झाला आहे. आता केवळ ३७२४ कोरोना रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत ४७०५८ इतक्या एकूण कोरोनो रुग्णांची नोंद झाली असून यांतील ४१७५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी दिवसभरात ४७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत १५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये ४२२ जणांची तपासणी करण्यात आली असून, ३१९ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १८८ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे.
यांचा झाला मृत्यू
- ५२ वर्षीय पुरुष माणगाव, ४५ वर्षीय महिला कोवाड (ता. चंदगड)
- ७६ वर्षीय पुरुष मुरुडे, ता. आजरा
- ४३ वर्षीय पुरुष संभाजीनगर, कोल्हापूर
- ७० वर्षीय पुरुष शहापूर,
- ६३ वर्षीय पुरुष, पंचवटी टॉकीजजवळ, इचलकरंजी
- ७७ वर्षीय पुरुष, कबनूर (ता. हातकणंगले)
- ६० वर्षीय पुरुष, सरोळी (ता. गडहिंग्लज)
तालुकावार आकडेवारी
मंगळवार (दि. १३) ते बुधवार (दि. १४ ऑक्टो.) सायं. ५ पर्यंत)
अ.क्र. तालुका एकूण पॉझिटिव्ह
- आजरा ८२१
- भुदरगड ११७९
- चंदगड ११३१
- गडहिंग्लज १३४८
- गगनबावडा १३३
- हातकणंगले ५१०९
- कागल १६०६
- करवीर ५४३८
- पन्हाळा १८०५
- राधानगरी १२०१
- शाहूवाडी १२५९
- शिरोळ २४०९
- नगरपालिका
- इचलकरंजी,
- जयसिंगपूर,
- कुरुंदवाड ७२३६
- कोल्हापूर शहर १४२५५
- इतर जिल्हा, राज्य २१२८
- एकूण ४७०५८
- एकूण मृत्यू १५७७