ठळक मुद्देफक्त १० जण कोरोना पॉझिटिव्हसहा महिन्यांतील दिलासादायक आकडा, मृत्यूही नाही
कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी असा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शुक्रवारी आला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत केवळ १० जण पॉझिटिव्ह आले असून, कोणाचाही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी रुग्णसंख्या कमी होत आहे म्हणून लोकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. बेफिकिरी वाढली तरी संसर्ग केव्हाही वाढू शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याभरापूर्वीची परिस्थिती गंभीर होती. एका-एका दिवसाला १४०० रुग्ण पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत. शुक्रवारी तर केवळ १० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
दिवाळीदरम्यान जिल्हाभर नागरिकांनी गर्दी केली असताना त्यानंतरच्या १४ दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी येणे आवश्यक आहे; तरच कोरोनाचा संसर्ग कमी झाला असे मानता येईल. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत असताना, कोल्हापूरची ही आकडेवारी दिलासादायक आहे; परंतु तरीही बेफिकीर राहून चालणार नाही. दक्षता घेण्याची गरज आहे.
दिवसभरामध्ये १३०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १५३७ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत; तर १३९ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. सध्या ४५० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक आकडेवारी
दिनांक पॉझिटिव्ह रुग्ण मृत्यू
- २० नोव्हेंबर ४६ १
- २१ ३५ ०
- २२ २१ ०
- २३ १६ ०
- २४ १८ २
- २५ १६ ३
- २६ २६ ०
- २७ नोव्हेंबर १० ०
Web Title: corona virus: only 10 corona positive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.