corona virus : सात तालुक्यात नवा एकही रुग्ण नाही, एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 10:39 IST2020-11-20T10:37:51+5:302020-11-20T10:39:37+5:30
coronavirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. मात्र उर्वरित ठिकाणी २२ नवे रुग्ण आढळले आहेत. २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

corona virus : सात तालुक्यात नवा एकही रुग्ण नाही, एकही मृत्यू नाही
कोल्हापूर : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. मात्र उर्वरित ठिकाणी २२ नवे रुग्ण आढळले आहेत. २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने आता तपासण्याही वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत १९८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २०४० जणांचे स्राव घेण्यात आले आहेत; तर १३१ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ५९७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांनी स्राव देण्यासाठी गर्दी सुरू केल्याने स्राव देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.