corona virus : आठ तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:00 IST2020-11-28T19:57:30+5:302020-11-28T20:00:18+5:30
CoronaVirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बारापैकी आठ तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या ४३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona virus : आठ तालुक्यांत एकही नवा रुग्ण नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बारापैकी आठ तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. सध्या ४३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील नव्या १९ रुग्णांपैकी आठ रुग्ण हे कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत; तर आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. गेल्या २४ तासांत ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १४७६ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १६० जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याभरापूर्वीची परिस्थिती गंभीर होती. एका-एका दिवसाला १४०० रुग्ण पाॅझिटिव्ह येत होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत.