शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

corona virus : कोल्हापुरात कोरोनामुळे नऊजणांचा मृत्यू; २२९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 8:02 PM

कोल्हापूर जिल्ह्यात कुठे धक्का तर कुठे दिलासा मिळत असला तरीही मंगळवारी दिवसभरात २०८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले. नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना वाढत असलेल्या बाधित आणि मृत्यूंची संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनामुळे नऊजणांचा मृत्यू; २२९ नवे रुग्णजिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कुठे धक्का तर कुठे दिलासा मिळत असला तरीही मंगळवारी दिवसभरात २०८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले. नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना वाढत असलेल्या बाधित आणि मृत्यूंची संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे.येथील सीपीआर रुग्णालयाने मंगळवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. २७) रात्री ते मंगळवारी दुपारपर्यंत २०८ रुग्ण आढळून आले होते. सायंकाळपर्यंत या संख्येत आणखी १०० रुग्णांची भर पडल्याचे सांगण्यात येत होते; परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नऊजणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांसह सात पुरुषांचा समावेश आहे.मृतांपैकी पाच व्यक्ती कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ, साळोखेनगर, उत्तरेश्वर, शनिवार पेठ, खरी कॉर्नर या परिसरांत राहणाऱ्या होत्या. इचलकरंजी शहरातील खंजिरे मळा व लायकर टॉकीजजवळील, तर करवीर तालुक्यातील सांगरूळ फाटा व पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १३८ वर जाऊन पोहोचली.मंगळवारी कोल्हापूर शहरात ५१, करवीर तालुक्यात १६, पन्हाळा तालुक्यात १०, शिरोळ तालुक्यात ३९, गडहिंग्लज शहरात सात, आजरा शहरात चार, तर राधानगरी तालुक्यात चार रुग्ण आढळून आले. आजरा शहरात ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ४८२९ कोरोनाचे रुग्ण झाले असून त्यातील १९३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांपैकी २७५६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी या दोन शहरांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर