corona virus :महापालिकेचे पोस्ट कोविड केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 18:31 IST2020-10-28T18:28:12+5:302020-10-28T18:31:07+5:30
muncipaltycarporation, coronavirus,kolhapurnews कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्राचे उद्घाटन बुधवारी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही त्रास होऊ लागल्यास अशा रुग्णांना येथे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

corona virus :महापालिकेचे पोस्ट कोविड केंद्र सुरू
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्राचे उद्घाटन बुधवारी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही त्रास होऊ लागल्यास अशा रुग्णांना येथे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते राहुल चव्हाण, उपायुक्त निखिल मोरे, युवराज दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, डॉ. रमेश जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते.
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास महानगरपालिकेच्यावतीने सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्रामध्ये त्यांच्यासाठी उपचाराच्या व समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यासाठी तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवा देण्याबरोबरच फिजिओथेरपी तसेच मानसिक आधारासाठी समुपदेशनाचे कामही केले जाणार आहे.
केंद्रात रुग्ण नोंदणी कक्ष, नर्सिंग कक्ष, औषध कक्ष, डॉक्टर कक्ष, तपासणी कक्ष आणि प्रतीक्षा कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे महापौर आजरेकर यांनी सांगितले.
सद्या कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आयुक्त बलकवडे यांनी यावेळी केले.
- पोस्ट कोविड केंद्राची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ.
- दुपारी एक ते तीन या वेळेत मिळणार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
- डॉक्टर्स, फिजिओथेरपी, समुपदेशन, नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देणार.