corona virus - Kolhapur woman from Iran dies in Jodhpur | corona virus - इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

corona virus - इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

ठळक मुद्देइराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यूमोमीन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडीलही कोरोना संशयित

कोल्हापूर : नातेवाइकांसमवेत इराक, इराण येथे धार्मिक दर्शन आणि पर्यटनासाठी आई, वडील गेलेले. कोरोनाचा कहर सुरू झाला. अनेक दिवस इराणमध्ये, मग दिल्लीत, नंतर जैसलमेर येथे क्वारंटाईनमध्ये. अशातच आईला अर्धांगवायूचा झटका, जोधपूरमध्ये रुग्णालयात दाखल, वडिलांना कोरोनाचा संशय आणि या सगळ्या धसक्याने गुरुवारी रात्री आईचा आकस्मिक मृत्यू  झाला.

कोल्हापूरच्या कदमवाडी रोडवरील मयूरा अपार्टमेंटमधील मोमीन कुटुंबीयांवर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईला भेटण्यासाठी निघालेल्या इरफान मोमीन यांची रुग्णवाहिका कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असूनही वापीच्या चेकपोस्टवर अडविण्यात आली आणि त्यांना पुन्हा कोल्हापूरला यावं लागलं. आता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत ते आईचे पार्थिव परत आणण्यासाठीचे.
 

Web Title: corona virus - Kolhapur woman from Iran dies in Jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.