corona virus in kolhapur -होम क्वारंटाईन पुजारी अंबाबाई मंदिरात, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:37 IST2020-03-25T17:21:01+5:302020-03-25T17:37:39+5:30
होम क्वारंटाईन असतानाही अंबाबाई मंदिरात येणारे पुजारी प्रसात कृष्णराव कारेकर (वय ६५ रा. मंगळवार पेठ) यांच्यावर बुधवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

corona virus in kolhapur -होम क्वारंटाईन पुजारी अंबाबाई मंदिरात, गुन्हा दाखल
कोल्हापूर : होम क्वारंटाईन असतानाही अंबाबाई मंदिरात येणारे पुजारी प्रसात कृष्णराव कारेकर (वय ६५ रा. मंगळवार पेठ) यांच्यावर बुधवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारेकर यांच्याकडे ओवरीवरील गणपती मंदिराच्या पुजेचे व्यवस्थापन आहे. ते नुकतेच परदेशातून आल्याने त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. सीपीआरमध्ये त्यांची तपासणी झाल्यानंतर २८ मार्चपर्यंत त्यांना घरातच थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
अशा नागरिकांवर जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. असे असतानाही बुधवारी सकाळी पुजेच्या साहित्यासह ते अंबाबाई मंदिर परिसरात आढळून आले.
ही माहिती समजताच कारेकर यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.