शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

corona virus : व्हेंटिलेटर तुटवड्यामुळे रुग्णांची गैरसोय, सीपीआरमधील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:49 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा अकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा आजही जाणवत आहे.

ठळक मुद्दे व्हेंटिलेटर तुटवड्यामुळे रुग्णांची गैरसोय, सीपीआरमधील परिस्थितीरोज १० ते १५ रुग्णांना फटका; प्रशासनाची धावाधाव सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा अकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा आजही जाणवत आहे.सीपीआरमध्ये अपुऱ्या व्हेंटिलेटरमुळे रोज किमान १२ ते १५ कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय होत आहे. व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेतील रुग्णांची प्रकृती स्थिर असेल तर त्याला ऑक्सिजन बेडवर घेतले जात आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू आहे.कोल्हापूर जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत; तर मृतांचा आकडा हा सुमारे ६९९ वर पोहोचला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी अत्यवस्थ असणाऱ्या तब्बल २८५ रुग़्णांवर सीपीआर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सीपीआर रुग्णालयाची एकूण बेड क्षमता ही ४५९ आहे; तर त्यांपैकी ३०२ बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहेत. णखी ८५ बेड वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सीपीआर रुग़्णालयात सुमारे २० हजार लिटर ऑक्सिजनची टाकी कार्यान्वित केल्यामुळे रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; पण तरीही अद्याप व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे.सीपीआरमध्ये सध्या ५४ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ते सर्व फुल्ल असल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. रोज किमान १२ ते १५ नव्या रुग्णांना त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.त्यांपैकी एखाद्या रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यास त्याला ऑक्सिजन बेडवर घेऊन व्हेंटिलेटर दुसऱ्या रुग्णास देऊन मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे अपुऱ्या व्हेंटिलेटरमुळे अनेक गंभीर रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर