corona virus -‘कोरोनो पॉझिटिव्ह’असल्याची यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:51 PM2020-03-23T17:51:12+5:302020-03-23T17:53:21+5:30

परदेशातून आलेल्या लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित करून ते ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर असून, अशी यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी दिला.

Corona virus - 'Corono positive' offenders list crimes: Superintendent of Police | corona virus -‘कोरोनो पॉझिटिव्ह’असल्याची यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे

corona virus -‘कोरोनो पॉझिटिव्ह’असल्याची यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोरोनो पॉझिटिव्ह’असल्याची यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हेपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला इशारा

कोल्हापूर : परदेशातून आलेल्या लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित करून ते ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर असून, अशी यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी दिला.

परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी प्रसारित करून ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अप्प्रचार सोशल मीडियावरून सुरू आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक देशमुख यांना विचारणा केली असता ते म्हणाले, कोरोनाबाधित विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच अनेक संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

परदेशातून आलेल्या व कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या काही लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित केली जात आहे. त्यामध्ये हे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. परंतु आपल्याकडे कोरोना पॉझिटिव्हचा कोणताही रुग्ण नाही.

जे परदेशातून आले आहेत त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तरीही त्यांना सक्तीने होम कोरोंटाईनच्या सूचना दिल्या आहेत. परंतु त्यांच्याबद्दल ‘कोरोना’बाधित रुग्ण असल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविली जात आहे. अशी चुकीची अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
 

 

Web Title: Corona virus - 'Corono positive' offenders list crimes: Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.