corona virus : गडहिंग्लजमध्ये कोरोनाचा कहर, ५६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:26 IST2020-09-21T14:24:54+5:302020-09-21T14:26:09+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. शनिवार व रविवारी मिळून दोन दिवसांत ५६ नव्या रुग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०७८ झाली.त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona virus : गडहिंग्लजमध्ये कोरोनाचा कहर, ५६ नवे रुग्ण
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. शनिवार व रविवारी मिळून दोन दिवसांत ५६ नव्या रुग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०७८ झाली.त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.
गडहिंग्लज शहरात एका दिवसात तब्बल २६ तर कडगाव, गिजवणे प्रत्येकी ५ ,हरळी खुर्द ३, नेसरी, ऐनापूर, जरळी, भडगाव, तळेवाडी प्रत्येकी २, जखेवाडी, नांगनूर, अर्जुनवाडी, कौलगे, वडरगे, लिंगनूर क॥नूल, माद्याळ येथील प्रत्येकी १ बाधित मिळून ग्रामीण भागात ३० नवे रुग्ण आढळून आले.
गडहिंग्लज शहरातील एकूण रूग्णसंख्या आजअखेर एकूण ३५५ झाली.त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला.एकूण २२३ रूग्ण बरे झाले असून ११४ जणांवर उपचार सुरू आहेत.दिवसागणिक शहरातील रूग्णसंख्या वाढते आहे.त्यामुळे शहराची वाटचाल 'हॉटस्पॉट'कडे सुरू आहे.
५ डॉक्टर,६ कर्मचारी बाधित..!
कोविड रूग्णालय घोषित झालेल्या गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील ४ डॉक्टर व ६ कर्मचारी बाधित तर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीही बाधित झाले आहेत.