corona virus : बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:36 IST2020-07-04T13:35:12+5:302020-07-04T13:36:13+5:30
इचलकरंजी येथील एका बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काल शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका 55 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

corona virus : बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोना
इचलकरंजी : येथील एका बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काल शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका 55 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या महात्मा हौसिंग सोसायटी मधील त्या 55 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात सुरू होते. तिचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, त्या बाधीत आढळलेल्या राजकीय कुटुंबातील दोघा पिता पुत्रांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारपर्यंत शहरातील एकूण बधितांची संख्या आता ५३ वर पोहचली आहे. त्यातील एकूण उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 43 असून आजअखेर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 जण बरे झाले आहेत.