corona virus : शहरात कोरोनाने गाठला बारा हजार रुग्णांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:20 IST2020-09-21T17:19:17+5:302020-09-21T17:20:30+5:30
शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने बारा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत बारा हजार ४३ रुग्ण झाले असून दिवसभरात ११७ नवे रुग्ण आढळून आले. या आजाराने २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona virus : शहरात कोरोनाने गाठला बारा हजार रुग्णांचा टप्पा
कोल्हापूर : शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने बारा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत बारा हजार ४३ रुग्ण झाले असून दिवसभरात ११७ नवे रुग्ण आढळून आले. या आजाराने २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरामध्ये शनिवारी राजारामपुरीत १७, कसबा बावडा १०, शाहूपुरी १४, ताराबाई पार्क ११, नागाळा पार्क ९, साने गुरुजी वसाहत १३, रायगड कॉलनी ९, दसरा चौक येथे ७ रुग्ण आढळून आले. शहरात अद्यापि १७३ परिसर रुग्ण आढळून आल्यामुळे सील आहेत.
हॉटस्पॉटमधील रुग्णसंख्या
राजारामपुरी ७३६, कसबा बावडा ६३९, शिवाजी पेठ ५८४, मंगळवार पेठ ५२४, शाहूपुरी ४०६, फुलेवाडी ३४८, ताराबाई पार्क ३४०.