corona virus : कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय: समूह संसर्गाला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:30 AM2020-07-07T11:30:31+5:302020-07-07T11:32:11+5:30

कोल्हापूर शहरात संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.

corona virus: Corona is growing, it is being ignored | corona virus : कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय: समूह संसर्गाला निमंत्रणच

corona virus : कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय: समूह संसर्गाला निमंत्रणच

Next
ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई समूह संसर्गाला निमंत्रणच, कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय

कोल्हापूर : शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तेव्हा संसर्ग होईल या भीतीमुळे दीड-दोन महिने स्वत:ला कोंडून घेणाऱ्या कोल्हापूरकरांनी आता मात्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना न पाळण्याचा गाफीलपणा, तसेच दुर्लक्ष समूह संसर्गाला आमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे वादळ कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचले. जिल्हा प्रशासनाने चांगली खबरदारी घेतली. लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी केला. त्यामुळे कोरोनापासून कोल्हापूरकरांचा बचाव झाला. परंतु, पुणे, मुंबई, तसेच अन्य रेडझोनमधील शहरातून नागरिक यायला लागले तसा बाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली. सुरुवातीला त्याचेही काही वाटले नाही. बाहेरून आला, वेळीच तपासणी झाली आणि अलगीकरणही करण्यात आल्याने कोरोना पसरला नाही. जरी रुग्ण आढळले तरी ते वेळीच क्वारंटाईन, तसेच रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्यापासून अन्य कोणाला फारशी बाधा झाली नाही.

परंतु, गेल्या काही दिवसांत ही रुग्ण संख्या वाढत असून, ती कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोनाचे रुग्ण आता हजाराचा टप्पा पार करीत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. भाजी मार्केट, बाजारपेठ अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे.

सामाजिक अंतराचे भानच नाही

अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाही, विना मास्क नागरिकांचा वावर आहे. मंडईत अथवा बाजारात गेले तरी त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर सामूहिकपणे एकत्रितपणे वावरणे सुरू आहे. संसर्ग होईल याचे भान कोणालाही राहिलेले नाही.

परस्पर शहरात घुसघोरी

शहरातील नागरिकांची तर कोरोनाचे संकट आता टळले आहे अशीच धारणा झाली की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. शहरात अनेकजण नाके चुकवून आले असून, परस्पर घरात गेले आहेत. ग्रामीण भागातसुद्धा पूर्वीसारखी देखरेख राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका वाढलेला आहे. अशा वेळी अधिक काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मास्क नसल्यास आजपासून दंड

कोल्हापूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अधिक कडक भूमिका घेतली असून, जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दंड करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा पहिला दणका पालिकेच्या अधिकाऱ्याला दिला. सोमवारी चक्क आस्थापना अधीक्षक सागर कांबळे यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला. आता ही मोहीम आज, मंगळवारपासून शहरात सुरू केली जाणार आहे.

Web Title: corona virus: Corona is growing, it is being ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.