corona virus : 'त्यांच्या' पाठीवर कौतुकाची थाप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:07 IST2020-09-22T15:05:59+5:302020-09-22T15:07:13+5:30
शेंद्रीमाळ ( ता. गडहिंग्लज ) येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला.यावेळी १२ गरजू कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप देण्यात आले.

शेंद्री माळ (ता.गडहिंग्लज) येथील शासकीय कोविड सेंटरमधील गरजु कर्मचाऱ्यांना प्रशासनातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, तलाठी अजय किल्लेदार उपस्थित होते.
गडहिंग्लज : शेंद्रीमाळ ( ता. गडहिंग्लज ) येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला.यावेळी १२ गरजू कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप देण्यात आले.
तहसीलदार दिनेश पारगे यांनी स्वत: कोविड सेंटरमध्ये जाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. त्यांच्याहस्ते सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक, पोलिस,वॉचमन व सफाई कर्मचारी यांचा सत्कार झाला.
तहसीलदार पारगे म्हणाले, जीवाची परवा न करता कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे तेच खरे 'कोरोना योध्दे' आहेत. यावेळी निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, तलाठी अजय किल्लेदार आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.