corona virus : कोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद, २७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:26 PM2020-09-08T19:26:02+5:302020-09-08T19:26:50+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक मंगळवारीदेखील कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत ९४५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीस हजार टप्पा ओलांडला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि उपचारात येत असलेल्या अडचणींमुळे लोकांत भीती आहे.

corona virus: 945 new cases registered in Kolhapur, 27 deaths | corona virus : कोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद, २७ जणांचा मृत्यू

corona virus : कोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद, २७ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद २७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक मंगळवारीदेखील कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत ९४५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीस हजार टप्पा ओलांडला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि उपचारात येत असलेल्या अडचणींमुळे लोकांत भीती आहे.

कोल्हापुरातील कोरोनाचा उद्रेक काही केल्या थांबायला तयार नाही. प्रत्येक दिवशी रुग्णसं‌ख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत चालले आहे. मंगळवारी त्यात आणखी ९४५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या ३० हजार ३०८ वर जाऊन पोहोचली तर मृत्यूची संख्या ९३४ च्या घरात पोहोचली. समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. समूह संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न होत असला तरी नागरिकांकडून तितके सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

शासकीय पातळीवर याबाबत लॉकडाऊनबाबत निर्णय होत नसल्याने काही तालुक्यांतील राजकीय, सामाजिक व्यक्तींनी एकत्र येऊन ह्यजनता कर्फ्यूह्णचे निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर शहरातही असा निर्णय घ्यावा यासाठी मंगळवारी महानगरपालिकेत महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यामध्ये अनेकांनी तशी मागणी केली.

Web Title: corona virus: 945 new cases registered in Kolhapur, 27 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.