corona virus : कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:09 IST2020-09-10T18:07:44+5:302020-09-10T18:09:02+5:30
कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अधिवेशन झाल्यानंतर चार ते पाच दिवसांत हा निधी वर्ग होईल. त्यामुळे कोल्हापूरबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधित लोकांसाठी लवकरच अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

corona virus : कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी मंजूर
कोल्हापूर : कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अधिवेशन झाल्यानंतर चार ते पाच दिवसांत हा निधी वर्ग होईल. त्यामुळे कोल्हापूरबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधित लोकांसाठी लवकरच अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
प्रशासनाला सूचना करत असतानाच मी शब्द दिला होता की निधी मिळवण्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो मी करीन. त्यानुसार बैठकीनंतर लगेचच मी विभागीय आयुक्तांशी संपर्क केला.
यावेळी कोल्हापूरसाठी ६० कोटी रुपये आणि त्यासोबतच सांगली, सोलापूर, आणि सातारा जिल्ह्यांची जी मागणी होती. ती सुद्धा मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचनाही दिल्या असून निविदेची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.