corona virus : कर्नाटकात १५ ऑगस्टपर्यंत २५ हजार होतील रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:44 IST2020-06-23T15:43:27+5:302020-06-23T15:44:43+5:30

येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे.

corona virus: 25,000 patients in Karnataka by August 15 | corona virus : कर्नाटकात १५ ऑगस्टपर्यंत २५ हजार होतील रुग्ण

corona virus : कर्नाटकात १५ ऑगस्टपर्यंत २५ हजार होतील रुग्ण

ठळक मुद्देकर्नाटकात १५ ऑगस्टपर्यंत २५ हजार होतील रुग्णकोव्हीड वॉर रूम इन्चार्ज मुनिष मोदगील यांचा अंदाज

बेळगांव : येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाचा सध्याचा ३ टक्के दर पाहता प्रक्षेपित दर ४ टक्के इतका पकडून मोदगील यांनी हा अंदाज वर्तविला आहे. विषाणू किती वेगाने पसरतोय यावर प्रक्षेपित दर ठरत असल्यामुळे बाजी त्यांचा निश्चित आकडा सांगता येणे शक्य नाही. तथापि या संदर्भात पुढील ५० ते ६० दिवस निर्णय ठरणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सतत हात धुणे या गोष्टींच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मनीष मोदगील यांनी स्पष्ट केले आहे.

लॉक डाऊनच्या प्रारंभीच्या काळात ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती केली जाऊ नये यावर जोर देऊन मोदगील म्हणाले की, प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट्स असलेल्या व्यक्तींना २४ तासात कॉरन्टाईन केले जावे. कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रत्येकाचे १४ दिवसाचे कॉरन्टाईन सक्तीचे करावे आणि रोग तपासणी प्रक्रियेचा वेग देखील वाढविण्यात यावा.

 

Web Title: corona virus: 25,000 patients in Karnataka by August 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.