corona virus : विना मास्क फिरणाऱ्यांना १४ हजारांचा दंड; कुरुंदवाड नगरपरिषदेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:28 IST2020-09-08T18:27:44+5:302020-09-08T18:28:33+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. आजअखेर ९४१ जणांकडून ९४ हजार २०० रुपये दंडाची वसुली केली आहे.

corona virus : विना मास्क फिरणाऱ्यांना १४ हजारांचा दंड; कुरुंदवाड नगरपरिषदेची कारवाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. आजअखेर ९४१ जणांकडून ९४ हजार २०० रुपये दंडाची वसुली केली आहे.
जयसिंगपूर नगरपरिषदेमार्फत विना मास्क ३९ व्यक्तींकडून सोमवारी ३ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आजअखेर विना मास्क १ हजार ६५ व्यक्तींकडून १ लाख ९ हजार ७८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३२ जणांकडून ७ हजार ४०, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या ५० जणांकडून ८ हजार रुपये, मास्क व ग्लोज न वापरणाऱ्या १४ दुकानदारांकडून २ हजार रुपये, मास्क, ग्लोज न वापरणाऱ्या २१२ फळ भाजी विक्रेत्यांकडून ३० हजार ८८० तर विहीत केलेल्या वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणाऱ्या ३६ जणांकडून ३२ हजार ४०० रुपये दंडाची वसुली केली आहे. चंदगड नगरपंचायतीकडून विना मास्क फिरणाऱ्या १५ नागरिकांकडून २ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.