CoronaVirus : बेळगावात १३ तर कर्नाटकात १०० कोरोना पॉझिटिव्ह वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:02 IST2020-05-26T17:00:50+5:302020-05-26T17:02:40+5:30
कर्नाटकी राज्यात १३ तर बेळगावात नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी आढळले आहेत. बेळगावचा आकडा १४३ वर पोहोचला आहे.

CoronaVirus : बेळगावात १३ तर कर्नाटकात १०० कोरोना पॉझिटिव्ह वाढले
बेळगाव : कर्नाटकी राज्यात १३ तर बेळगावात नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी आढळले आहेत. बेळगावचा एकूण आकडा १४३ वर पोहोचला आहे.
बेळगावात आढळलेले १३ जण झारखंड रिटर्न होते. ते शिरगुप्पी येथे क्वारंटाइन झाले होते.काल सोमवारी १४ जण कोरोना मुक्त झाले होते मात्र मंगळवारी आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. नवीन १३ रुग्णांत ६ पुरुष तर सात महिला आहेत.
हे १३ जण झारखंड येथील समेद शिखरजी येथून दर्शन घेऊन परतले होते. शिरगुप्पी येथे क्वांरंटाइन झाले होते, ते अथणी आणि कागवाड तालुक्यातील विविध गावातील असून १३ जणांना देखील बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात देखील १०० रुग्णांची वाढ झाली आहे राज्य २२८२ रुग्ण झाले आहेत.