corona virus: 11 corona victims die in the district | corona cases in kolhapur : जिल्ह्यात ११ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू

corona cases in kolhapur : जिल्ह्यात ११ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात ११ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू नवे ३०८ रूग्ण, ९९ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर : जिल्ह्यातील अकरा कोरोना रूग्णांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला असून गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक मृतांची संख्या आहे. जिल्ह्यात नवे ३०८ रूग्ण नोंद झाले असून ९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सोमवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासातील ही मृतांची ही आकडेवारी धक्कादायक असून यापुढच्या काळात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि नागरिकांनाही अधिक दक्ष रहावे लागणार आहे. कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजे १६१ रूग्ण नोंदवण्यात आले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात २९ तर नगरपालिका क्षेत्रात २६ रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात दिवसभरामध्ये १०७६ जणांची तपासणी करण्यात आली असून २११० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ४४० जणांची अन्टीजेन चाचणी करण्यात आली असून सध्या २४०८ जण उपचार घेत आहेत.

मृतांमध्ये सात महिलांचा समावेश

पन्हाळा तालुक्यातील नावली येथील ६५ वर्षीय पुरुष, जाखले येथील ७० वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील नाना पाटील नगर येथील ४० वर्षीय महिला, रंकाळा येथील ५८ वर्षीय महिला, सानेगुरूजी वसाहत येथील ६७ वर्षीय महिला, तपोवन कळंबा येथील ७० वर्षीय महिला, उजळाईवाडी येथील ६९ वर्षीय पुरष, चंदगड येथील ६० वर्षीय महिला, शाहूवाडी तालुक्यातील येळणे येथील ६६ वर्षीय पुरुष, औत्तूर येथील ८० वर्षीय पुरूष आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील ७५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.


तालुकानिहाय कोरोना रूग्ण आकडेवारी

 • आजरा ०६
 • भुदरगड ०७
 • चंदगड ०१
 • गडहिंग्लज १२
 • गगनबावडा ०१
 • हातकणंगले १९
 • कागल-०३
 • करवीर २९
 • पन्हाळा १०
 • राधानगरी ०७
 • शाहूवाडी ०३
 • शिरोळ १५
 • नगरपालिका क्षेत्र २६
 • कोल्हापूर महापालिका १६१
 • इतर जिल्ह्यातील ०८

Web Title: corona virus: 11 corona victims die in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.