शहरात १८३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:53+5:302021-01-17T04:22:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार शनिवारी महापालिकेच्यावतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ...

शहरात १८३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार शनिवारी महापालिकेच्यावतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोरोना लसीकरण मोहीम राबवली. शासकीय, खासगी आरोग्य विभागातील १८३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यामध्ये डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स यांचा समावेश आहे. महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटल येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे सकाळी ११ वाजता आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मोहिमेला सुरुवात झाली. येथे विस्तार अधिकारी सुरेश मगदूम यांना पहिली लस देण्यात आली तर आशा स्वयंसेविका पल्लवी कुरळे यांना दुसरी लस दिली.
यावेळी उपायुक्त निखिल मोरे, सहा. आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, माजी नगरसेवक अशोक जाधव, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने, लसीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली यादव आदी उपस्थित होते.
महापालिकेचे पहिल्या टप्प्यात लस देण्याचे उद्दिष्टे : ११ हजार ११९
पहिल्या दिवशी लसीकरण : १८३
लसीकरण केंद्र : सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, महाडिक माळ, राजारामपुरी व सदर बाजार नागरी सुविधा केंद्र
चौकट
लसीकरण मोहीम तीन ते चार टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यामध्ये ५० वर्षावरील नागरिक व ५० वर्षाखालील कोमॉर्बीड (विविध आजाराने त्रस्त) नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
फाेटो : १६०१२०२१ कोल केएमसी महापालिका कोरोना लसीकरण मेन न्यूज
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने पंचगंगा हॉस्पिटल येथील नागरिक सुविधा केंद्रात शनिवारी विस्तार अधिकारी सुरेश मगदूम यांना पहिली कोरोना लस देण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, आदी उपस्थित होते.