corona updates In Kolhapur : रूग्ण वाढले पण मृत्यू एकदम घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 19:21 IST2021-08-05T19:21:31+5:302021-08-05T19:21:52+5:30
corona updates In Kolhapur : कोरोनाचे नवे रूग्ण पुन्हा वाढले असले तरी कोरोनाच्या मृत्यूसंख्येमध्ये एकदम घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. नव्या ८१३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या साडे तीन महिन्यात ही मृतांची सर्वात कमी संख्या आहे.

corona updates In Kolhapur : रूग्ण वाढले पण मृत्यू एकदम घटले
ठळक मुद्देरूग्ण वाढले पण मृत्यू एकदम घटले
कोल्हापूर : कोरोनाचे नवे रूग्ण पुन्हा वाढले असले तरी कोरोनाच्या मृत्यूसंख्येमध्ये एकदम घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. नव्या ८१३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या साडे तीन महिन्यात ही मृतांची सर्वात कमी संख्या आहे.
करवीर तालुक्यात १६३, पन्हाळा तालुक्यात ११३ तर कोल्हापूर शहरातील १०२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांमध्ये कोल्हापूर शहरातील तिघांचा समावेश आहे.
तालुकावार मृत्यू
- कोल्हापूर ०३
राजोपाध्येनगर, नागाळा पार्क, अयोध्या पार्क
- करवीर १
हातकणंगले ०१
खोतवाडी
- इचलकरंजी ०१
- कागल ०१
कसबा सांगाव