कोरोना चाचणी अहवाल आता मोबाईलवरच देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:06 PM2020-09-16T19:06:08+5:302020-09-16T19:08:21+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे अहवाल यापुढे स्वॅब देणाऱ्या व्यक्तीच्या थेट मोबाईलवरच देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतून आलेला अहवाल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचण्यास होणारा वेळ व धावपळ वाचणार आहे, अशी माहिती सीपीआर रुग्णालयातील डॉ. अपराजित वालावलकर यांनी सांगितली.

The Corona test report will now be available on mobile only | कोरोना चाचणी अहवाल आता मोबाईलवरच देणार

कोरोना चाचणी अहवाल आता मोबाईलवरच देणार

Next
ठळक मुद्देकोरोना चाचणी अहवाल आता मोबाईलवरच देणारप्रयोगशाळेतून आलेला अहवाल पोहचण्यास होणारा वेळ वाचणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे अहवाल यापुढे स्वॅब देणाऱ्या व्यक्तीच्या थेट मोबाईलवरच देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतून आलेला अहवाल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचण्यास होणारा वेळ व धावपळ वाचणार आहे, अशी माहिती सीपीआर रुग्णालयातील डॉ. अपराजित वालावलकर यांनी सांगितली.

प्रयोग शाळेतून होणाऱ्या कोरोना चाचणीचे अहवाल आधी सीपीआर प्रशासनाकडे यायचे. तेथून ते संबंधित विभागाकडे पाठविले जात होते. त्यामुळे अहवाल येऊन देखिल तो रुग्णांपर्यंत पोहचण्यास वेळ लागत होता. त्यामुळे यापुढे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात चाचणी अहवाल संबंधितांना मिळावा म्हणून थेट टेक्स्ट मेसेजद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. ज्यावेळी स्वॅब दिला जाईल त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर घेतला जातो. त्या नंबरवरच अहवाल देण्यात येणार आहे.

Web Title: The Corona test report will now be available on mobile only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.