बिंदू चाैक सबजेलमधील कैद्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:26 IST2021-04-09T04:26:16+5:302021-04-09T04:26:16+5:30

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दक्षता म्हणून बिंदू चौक सबजेलमधील सुमारे ८० कच्च्या कैद्यांची गुरुवारी ...

Corona test of prisoners in point chaik subjail | बिंदू चाैक सबजेलमधील कैद्यांची कोरोना चाचणी

बिंदू चाैक सबजेलमधील कैद्यांची कोरोना चाचणी

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दक्षता म्हणून बिंदू चौक सबजेलमधील सुमारे ८० कच्च्या कैद्यांची गुरुवारी दुपारी कोरोना चाचणी घेण्यात आली.

चार दिवसांपूर्वी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक संशयित आरोपीला बिंदू चौक सबजेलमध्ये कोठडीत दाखल केले होते. त्या कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्याने कारागृहात खळबळ उडाली. दक्षता म्हणून गुरुवारी दिवसभरात सबजेलमधील सुमारे ८० कच्च्या कैद्यांची शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेण्यात आली. त्याचा अहवाल आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कारागृहात प्रशासनाने कमालीची दक्षता घेतली होती. तरीही कारागृहात कोरोनाचा शिरकावा झाला. त्यासाठी दक्षता म्हणून कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची बाहेर ने-आण पूर्णपणे थांबवली आहे.

Web Title: Corona test of prisoners in point chaik subjail