corona virus-‘कोरोना’ रुग्णाच्या अफवेने बापूरामनगरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:21 PM2020-03-19T16:21:03+5:302020-03-19T16:23:35+5:30

‘कोरोना’ रुग्ण असल्याची धास्ती सर्वसामान्यांत दिवसेंदिवस वाढत आहे. कळंबा मार्गावर बापूराम नगरात एका युवकास कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयामुळे परिसरात खळबळ माजली.

'Corona' patient rumors in Bapuramanagar | corona virus-‘कोरोना’ रुग्णाच्या अफवेने बापूरामनगरात खळबळ

corona virus-‘कोरोना’ रुग्णाच्या अफवेने बापूरामनगरात खळबळ

Next
ठळक मुद्दे‘कोरोना’ रुग्णाच्याअफवेने बापूरामनगरात खळबळसंसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळल्याने सुस्कारा

कोल्हापूर : ‘कोरोना’ रुग्ण असल्याची धास्ती सर्वसामान्यांत दिवसेंदिवस वाढत आहे. कळंबा मार्गावर बापूराम नगरात एका युवकास कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयामुळे परिसरात खळबळ माजली.

शेजाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयास फोन करून त्याची माहिती दिली; पण तपासणीअंती त्याच्यात ‘कोरोना’ संसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळल्याने अनेकांनी सुस्कारा सोडला.

बापूरामनगरमध्ये एका युवकास सर्दी व खोकला झाल्यामुळे चार दिवसांपूर्वी त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्याला घरी सोडून दिले; पण त्याच्या घरातील शेजाऱ्यांनी त्याला ‘कोरोना’ झाल्याची धास्ती घेतली.

शेजाऱ्यांनी तातडीने ‘सीपीआर’मधील ‘कोरोना’ कक्षाशी संपर्क साधला. त्याला नेण्यासाठी ‘सीपीआर’ची रुग्णवाहिका तातडीने त्याच्या घरी पोहोचली; त्यामुळे ‘कोरोना’ची अफवा भागात पसरली व खळबळ माजली.

त्या रुग्णास तातडीने सीपीआर रुग्णालयात आणून तपासणी केली; पण त्याच्यामध्ये ‘कोरोना’ संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले; त्यामुळे परिसरातील लोकांनी निश्वास सोडला; मात्र ‘कोरोना’ची अफवा वाढतच राहिली.
 

 

Web Title: 'Corona' patient rumors in Bapuramanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.