corona updates In Kolhapur : कोरोना रूग्णसंख्या आली कमी, २० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 20:28 IST2021-08-04T20:26:36+5:302021-08-04T20:28:11+5:30
corona updates In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६५७ जणांनी कोरोनावर मात केली असून ५ हजार २७१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

corona updates In Kolhapur : कोरोना रूग्णसंख्या आली कमी, २० जणांचा मृत्यू
कोल्हापूर : जिल्ह्यात नव्याने ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६५७ जणांनी कोरोनावर मात केली असून ५ हजार २७१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर शहरात १२२, करवीर तालुक्यात ७१ तर हातकणंगले तालुक्यात २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर करवीर तालुक्यातील पाच आणि कोल्हापूर शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे बाधित रुग्णांची संख्या कमी येत आहे. परंतु म्हणावी तेवढ्या प्रमाणात मृत्यूची संख्या कमी येत नाही. २० मृतांपैकी चौघेजण अन्य जिल्ह्यांतील आहेत.
तालुकावार मृत्यू
- करवीर ०४
- कोल्हापूर ०३
शाहूपुरी, श्री कॉलनी लाईन बाजार, साईप्रसाद कॉलनी
- कागल ०३
कागल २, मुरगूड
- हातकणंगले ०२
पट्टणकोडोली २
- राधानगरी ०१
टिटवे
- शिरोळ ०१
दत्तवाड
- पन्हाळा ०१
बहिरेवाडी
- इतर जिल्हे ०५
देवर्डे, मिरज, स्ववाडी, निपाणी २