शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

corona in kolhapur-निवारागृहांतील लोकांंची मागविली राज्य शासनाने माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:38 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचे की, आपल्या गावी पाठवायचे याबाबतचा निर्णय केंद्र व राज्य सरकार पातळीवर होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासनाकडून येथील लोकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यासह परराज्यांतील ८१९ जणांचा समावेश जिल्हा प्रशासनाकडून माहिती सादर

प्रवीण देसाईकोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचे की, आपल्या गावी पाठवायचे याबाबतचा निर्णय केंद्र व राज्य सरकार पातळीवर होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासनाकडून येथील लोकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह करवीर तालुका, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, गगनबावडा, आदी तालुक्यांतील निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ व परराज्यांतील ५९७ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये कर्नाटकातील २१७ जणांचे, तमिळनाडूमधील २१४ जण, राजस्थानमधील ८०, मध्यप्रदेशमधील ४२,उत्तर प्रदेशमधील २९, केरळमधील आठ, झारखंड तीन, पुडुचेरीमधील एक, पश्चिम बंगालमधील एक, आंध्रप्रदेश एक, बिहार एक, अशा एकूण ११ राज्यांतील ५९५ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे; तर महाराष्ट्रातील २२२ जणांचेही येथील निवारागृहात अलगीकरण करण्यात आले आहे.

यातील बहुतांश जणांचा उद्या, मंगळवारी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निवारागृहांतील लोकांची माहिती मागविली आहे. त्यानुसार रविवारी जिल्हा प्रशासनाकडून निवारागृहांतील राज्य व परराज्यांतील लोकांची संख्या यांसह इतर माहिती राज्य शासनाला कळविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांतील लोकांना पाठवायचे की नाही, हा निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु परराज्यांतील लोकांबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारकडूनच होणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार पातळीवर उद्या, मंगळवारी काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर