corona in kolhapur-धक्कादायक : कोल्हापूरात आणखी तीन जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:44 PM2020-05-12T19:44:17+5:302020-05-12T19:45:14+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती सायंकाळी सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील ...

corona in kolhapur- shocking: three more corona in kolhapur | corona in kolhapur-धक्कादायक : कोल्हापूरात आणखी तीन जणांना कोरोना

corona in kolhapur-धक्कादायक : कोल्हापूरात आणखी तीन जणांना कोरोना

Next
ठळक मुद्देधक्कादायक : कोल्हापूरात आणखी तीन जणांना कोरोना दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्याला तीन धक्के

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती सायंकाळी सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील माणगाव आणि केर्ले येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. पाठोपाठ पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे कळविल्याने दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्याला तीन धक्के बसले.

शाहूवाडी तालुक्यातील माणगाव येथील तरुण मुंबईहून आलेला आहे. २0 वर्षीय या तरुणाने विक्रोळी-मुंबई येथून प्रवास करत कोल्हापूरात आला होता. त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.

केर्ले येथील तरुण तामिळनाडू येथून कोल्हापूरात आला आहे. हा तरुण २३ वर्षीय असून तो १0 मे पासून सीपीआर रुग्णालयात उपचार घेत आहे. या तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याला कोरोना कक्षात हलविण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे दोन्ही रुग्ण शाहुवाडी तालुक्यातील असल्याने हा तालुका हॉटस्पॉट ठरला आहे. यापूर्वी तीन रुग्ण कोरोनाबाधीत होते. पण त्यांच्यावरील उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते.

पाठोपाठ दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे वृत्त आल्याने प्रशासन काळजीत असतानाच पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील ३0 वर्षे वयाच्या तरुणालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा तरुण मुंबईत नानावटी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो ९ मे रोजी कोल्हापूरात आला होता.

सीपीआरमध्ये त्याचा स्वॅब अहवाल तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता त्याच्यावर सीपीआरच्या कोरोना कक्षात उपचार करण्यात येईल.

कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केल्या असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: corona in kolhapur- shocking: three more corona in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.