Corona in kolhapur : कोरोनाग्रस्तांसाठी नूलच्या सुरगीश्वर मठाची ५१ हजार रूपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:03 IST2020-04-07T15:34:44+5:302020-04-07T16:03:57+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील सुरगिश्वर संस्थान मठाने कोरोनाग्रस्तांसाठी मदत दिली आहे.

Corona in kolhapur : कोरोनाग्रस्तांसाठी नूलच्या सुरगीश्वर मठाची ५१ हजार रूपयांची मदत
ल/कोल्हापूर:राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे.त्यामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक दानशूर पुढे येत आहेत.यामध्ये नूल ता.गडहिंग्लज येथील सुरगीश्वर संस्थान मठही मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
मठाचे मठाधिपती ष.ब्र.चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती निवारण रिलीफ फंडाला ५१ हजार रूपयांची मदत करून राज्यातील मठाधिशांसमोर आदर्श ठेवला आहे.
नूल येथील प्राचीन श्री.सुरगीश्वर संस्थान मठातर्फे गोरगरीबांना संकटकाळात नेहमी मदत केली जाते.महापूरातही भरघोस मदत करण्यात आली.
धार्मिक,शैक्षणिक, वैदीक शिक्षणात मठाचे मोठे योगदान आहे. मठाचे थोरले मठाधिपती ष.ब्र.चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचा ६ एप्रिल हा वाढदिवस भक्त्तगण दरवर्षी साजरा करतात.मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे स्वामीजीनी वाढदिवस साजरा न करण्याचा मनोदय नूतन मठाधिपती ष.ब्र.गुरूसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजींना बोलावून दाखवला.
त्यानुसार वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून मठातर्फे ५१ हजार रूपये कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रिलीप फंडाला मदत म्हणून दिले.
मदतीचा धनादेश तहसिलदार दिनेश पारगे यांच्याकडे नूतन मठाधिपती ष.ब्र.गुरूसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.यावेळी प्रवीण शिंदे,अजित नडगदल्ली ,रवी खवणे,संजय थोरात उपस्थित होते.