Corona in kolhapur: त्या दोन मृतांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 14:23 IST2020-04-01T14:23:18+5:302020-04-01T14:23:35+5:30
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष कोरोना कक्षामध्ये मंगळवारी ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता त्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

Corona in kolhapur: त्या दोन मृतांचे अहवाल निगेटिव्ह
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी विशेष कोरोना कक्षामध्ये ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता त्या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मंगळवारी सकाळी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये शालन जमादार या 85 वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला होता. तसेच सकाळी 11 वाजता सीपीआरच्या विशेष कोरोना कक्षामध्ये हातकणंगले येथील एका 37 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता.
एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती या दोघांचीही घशातील स्त्राव पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्याचा बुधवारी दुपारी अहवाल आला असून हे दोन्ही निगेटिव आलेले आहेत.