corona in kolhapur -नगरसेविकेने केली स्वत: औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:31 IST2020-04-03T18:26:34+5:302020-04-03T18:31:28+5:30
कोरोना संसर्गाच्या भीतीने महापालिका कर्मचारी शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवित आहेत. या मोहिमेत शुक्रवारी नगरसेविका रिना कांबळे यांनीही भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.

corona in kolhapur -नगरसेविकेने केली स्वत: औषध फवारणी
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने महापालिका कर्मचारी शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवित आहेत. या मोहिमेत शुक्रवारी नगरसेविका रिना कांबळे यांनीही भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.
रिंगरोड परिसरात शुक्रवारी झालेल्या औषध फवारणी मोहिमेत फुलेवाडी रिंगरोडच्या नगरसेविका रिना कांबळे यांनी स्वत: कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने ट्रॅक्टर टॅँकरद्वारे सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी ज्योतिर्लिंग कॉलनी, सद्गुरू कॉलनी, गजानन सोनाई कॉलनी, भोगमपार्क, राजे संभाजी कॉलनी, साईप्रसाद कॉलनी, हरिप्रियानगर, शिवशक्ती कॉलनी, गडकरी कॉलनी, जयवंतराव साळोखे पार्क, कोतवालनगर, महादेव कॉलनी, तामजाई कॉलनी, आहिल्याबाई होळकरनगर या ठिकाणी औषध फवारणी केली.
नागरिकांनी आपल्या भागामध्ये सर्वांनी दक्षता घ्यावी, घराबाहेर पडू नये, संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, गर्दी करू नये, सर्दी-ताप-खोकला-अंगदुखी असल्यास डॉक्टरांचा त्वरीत सल्ला घ्यावा, घरी रहा - सुरक्षित रहा, असे आवाहनही कांबळे यांनी नागरिकांना केले.