शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

corona in kolhapur -पोलिसांतील माणुसकीचे दर्शन ! गावी परतणाऱ्या कुटूंबाला दिले जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:10 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : गाड्या बंद असल्यामुळे चालत गावी परतणाऱ्या कुटूंबाला स्वत:कडील जेवण देत दुधाच्या गाडीतून गावाकडे पाठवणाऱ्या  ...

ठळक मुद्देपोलिसांतील माणुसकीचे दर्शन !  गावी परतणाऱ्या कुटूंबाला दिले जेवण

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : गाड्या बंद असल्यामुळे चालत गावी परतणाऱ्या कुटूंबाला स्वत:कडील जेवण देत दुधाच्या गाडीतून गावाकडे पाठवणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर काठीचे रट्टे हाणणाऱ्या पोलिसांतील माणुसकीचेही दर्शन गुरुवारी वाघबीळ घाटात घडले.कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून सर्वत्र संचारबंदी केल्याने पै-पाहुण्यांकडे गेलेल्या लोकांना गावाकडे जाणे मुश्किल झाले होते. दोनच दिवसापूर्वी मलकापूर येथील एक कुटूंब केर्ली (ता. करवीर) येथे घरगुती कार्यक्रमासाठी आले होते.

गावात पै-पाहुण्यांना आसरा देऊ नका असा फतवा प्रत्येक ग्रामपंचायतीने काढल्यामुळे या कुटूंबानेही गड्या! आपला गाव बरा असे म्हणून गुरूवारी बोजा गुंडाळून गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण गाड्या बंद असल्यामुळे अखेर त्यांनी पायी चालत जाण्याचे ठरविले. मलकापूर जवळील धनगर वाड्यातील नवरा, बायको आणि दोन मुलींचे हे कुटूंब सकाळी सात वाजता केर्ली येथून निघाले.घाट चढून दुपारी एकच्या सुमारास घामाघूम होत ते वाघबीळ फाटा येथे पोहचले.पण समोर पोलिस पाहून त्यांची पाचावर धारण बसली. पोलिसांच्या माराच्या भितीने घाबरलेल्या या कुटूंबाने पायी चालत गावी जात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांमधील माणुसकी जागली.

त्यांनी वाघबीळातील बसस्थानकात त्यांना बसवून स्वत:कडील जेवण आणि पाणी देऊन त्यांना धीर दिला आणि त्यांना दुध भरायला जाणाऱ्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावाकडे सुखरूप पाठवले. ४० किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठणे त्या कुटूंबासाठी मुश्किल होतं; परंतू पोलिसांमुळे त्यांचा प्रवास सुखकर झाला.शाहुवाडी निर्भया पथकातील पोलिस राहूल मस्के, समीराज पाटील, पोपट माने, सुशिल सांवत या पोलिसांच्या माणूसकीमुळे हे शक्य झाल्याने त्या कुटंूबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर