Corona in kolhapur: Corona report of deceased in Rajiv Gandhi Nagar unavailable | Corona in kolhapur : राजीव गांधी नगरमधील मृताचा कोरोना अहवाल अप्राप्त

Corona in kolhapur : राजीव गांधी नगरमधील मृताचा कोरोना अहवाल अप्राप्त

ठळक मुद्देराजीव गांधी नगरमधील मृताचा कोरोना अहवाल अप्राप्तन्यूमोनियाने आजारी

कोल्हापूर :  मार्केट यार्डजवळील राजीव गांधी नगरमधील ४६ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा कोरोना बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात १८ ते २५ मार्च या कालावधीत तो उपचारासाठी दाखल झाला होता. त्यानंतर त्याला आज सीपीआरमाध्ये दुपारी ३ वा दाखल करण्यात आले होते. त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया झाल्याचे तसेच यकृताचा गंभीर आजार दिसून आला.

त्याच्यावर उपचार सुरु असताना दुपारी ४-३० वा त्याचा मृत्यू झाला. त्याचा बाधित देशात, शहरात प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता.

तरीही सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.

Web Title: Corona in kolhapur: Corona report of deceased in Rajiv Gandhi Nagar unavailable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.