Corona in kolhapur : राजीव गांधी नगरमधील मृताचा कोरोना अहवाल अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 19:58 IST2020-04-08T19:52:54+5:302020-04-08T19:58:17+5:30
मार्केट यार्डजवळील राजीव गांधी नगरमधील ४६ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा कोरोना बाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

Corona in kolhapur : राजीव गांधी नगरमधील मृताचा कोरोना अहवाल अप्राप्त
कोल्हापूर : मार्केट यार्डजवळील राजीव गांधी नगरमधील ४६ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा कोरोना बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात १८ ते २५ मार्च या कालावधीत तो उपचारासाठी दाखल झाला होता. त्यानंतर त्याला आज सीपीआरमाध्ये दुपारी ३ वा दाखल करण्यात आले होते. त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया झाल्याचे तसेच यकृताचा गंभीर आजार दिसून आला.
त्याच्यावर उपचार सुरु असताना दुपारी ४-३० वा त्याचा मृत्यू झाला. त्याचा बाधित देशात, शहरात प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता.
तरीही सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.