शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

Corona in kolhapur : 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227, परराज्यातील 581-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 6:18 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 तर परराज्यातील 581जण विलगिकरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 परराज्यातील 581-जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 आणि परराज्यातील 581 अशा एकूण 808 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 20 परराज्यातील ४ अशा 24 जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे.

रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील २० परराज्यातील ८ अशा २८ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. मुलींची शाळा क्र. ६ लाईन बाजार येथे परराज्यातील ७ असून याची क्षमता २५ जणांची आहे.

करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील २ परराज्यातील ३५ एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी - राज्यातील ८, परराज्यातील 30 असे एकूण 38 असून याची एकूण क्षमता ५० जणांची आहे.

कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ एकूण १०० जण असून क्षमता ११३ जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 23 परराज्यातील 95 असे एकूण 118 जण असून क्षमता 130 जणांची आहे.

हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 78 जण असून क्षमता १०० जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील २ परराज्यातील 104 असे एकूण 106 जण असून क्षमता ११५ जणांची आहे.

शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ४३ परराज्यातील ८ एकूण ५१ जण असून क्षमता ५५ जणांची आहे. राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील ६४ जण असून क्षमता ७० जणांची आहे

शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील १४ परराज्यातील १७ असे एकूण ३१ क्षमता ५० आहे.गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील १० परराज्यातील १ एकूण ११ असून क्षमता २४ जणांची आहे,

गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील १३ जण असून क्षमता २० जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५ परराज्यातील ९७ असे एकूण १०२ असून क्षमता १०५ जणांची आहे.

यामध्ये तामिळनाडूमधील 198, कर्नाटकातील 215, राजस्थानमधील ८१, मध्यप्रदेशमधील 44, उत्तर प्रदेशमधील 29, केरळमधील 10, पाँडेचरीमधील २,पश्चिम बंगालमधील १ बिहार १ अशा एकूण ९ राज्यातील 581 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 227 असे मिळून 808 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर