corona in kolhapur-रोहित पवार यांच्याकडून जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझर : जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:32 IST2020-04-09T17:30:55+5:302020-04-09T17:32:19+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत (जि. अहमदनगर)चे आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंधक उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जत (जि. अहमदनगर)चे आमदार रोहित पवार यांच्या वतीने ६०० लिटर सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी संजय शिंदे, अमन मित्तल, जिल्हाधिकारी दौलत देसाई, नवीद मुश्रीफ, महेंद्र चव्हाण उपस्थित होते.
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत (जि. अहमदनगर)चे आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंधक उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हे सॅनिटायझर गुरुवारी सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, महेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर दालमिया फाउंडेशनकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयास २० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने दालमिया फाउंडेशनचे आभार मानले.