Coronavirus in karnataka : कर्नाटकातील संख्येत २१६ जणांची भर, बेळगावात एकजणाला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:30 IST2020-05-23T18:29:29+5:302020-05-23T18:30:19+5:30
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने २१६ कोरोनाबाधितांची भर पडल्यामुळे शनिवार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १९५९ इतकी झाली आहे.

Coronavirus in karnataka : कर्नाटकातील संख्येत २१६ जणांची भर, बेळगावात एकजणाला कोरोना
बेळगाव : कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने २१६ कोरोनाबाधितांची भर पडल्यामुळे शनिवार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १९५९ इतकी झाली आहे.
नव्याने आढळून आलेल्या बाधितांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथील एका महिलेचा समावेश आहे. बेळगावातही एकाला कोरोना झाल्याचे आज सायंकाळी स्पष्ट झाले. यामुळे बेळगावातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या १२१ इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवारी सायंकाळी राज्यात विविध ठिकाणी एकूण २१६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील करुणा बाधित यांची संख्या १९५९ इतकी वाढली आहे.
आतापर्यंत कोरोना मुक्त झाल्यामुळे ५९८ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल शुक्रवारी सायंकाळपासून राज्यात धोरणामुळे एकाचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना मृतांची संख्या ४२ इतकी झाली आहे. तथापि यापैकी दोघांच्या मृत्यूची अन्यही कांही कारणे आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे आढळून आलेली २७ वर्षीय महिला महाराष्ट्रातून जिल्ह्यात आली आहे. ही महिला गर्भवती असून तिला कॉरन्टाईन करण्यात आले आहे. राज्यात नव्याने आढळून आलेल्या २१६ कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये १0६ पुरुष आणि ९0 महिलांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण यादगीर जिल्ह्यांमध्ये ७२ सापडले आहेत.
यादगीर खालोखाल रायचूर जिल्ह्यात ३८ मंड्या जिल्ह्यात २८ आणि चिकबळ्ळापूर जिल्ह्यात २0 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गदक जिल्ह्यात १३ रुग्ण आढळून आले असून अन्य कोरोनाबाधित रुग्ण कलबुर्गी, मंगळूर, हासन, बेंगलोर शहर, दावणगिरी, कोलार, बेळगाव, कारवार, धारवाड व उडपी जिल्ह्यातील आहेत.
विशेष म्हणजे राज्यात नव्याने आढळून आलेल्या २१६ कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल सुमारे १७३ रुग्ण महाराष्ट्रातून संबंधित जिल्ह्यात आलेले आहेत.