हातकणंगलेच्या पश्चिम भागात कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:25+5:302021-05-01T04:23:25+5:30

दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : हातकणंगले तालुका पश्चिम विभागातील चौदा गावांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले ...

The corona grove in the western part of Hatkanangle | हातकणंगलेच्या पश्चिम भागात कोरोनाचा विळखा

हातकणंगलेच्या पश्चिम भागात कोरोनाचा विळखा

दिलीप चरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : हातकणंगले तालुका पश्चिम विभागातील चौदा गावांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दोन टक्के आहे. पारगाव, किणी, भादोले व अंबप गावची रुग्णसंख्या जास्त आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन परिसरातील गावांनी 'ब्रेक द चेन' साठी 'जनता कर्फ्यू' चा उपक्रम राबविला आहे. जनता कर्फ्यूत गावातील ‘अत्यावश्यक सेवा’वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांपैकी चौदा गावांचा समावेश पश्चिम विभागात होतो. नीलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, पाडळी, अंबप, मनपाडळे, अंबपवाडी, तळसंदे, चावरे, वाठार, किणी, घुणकी, भादोले व लाटवडे या चौदा गावांचा आढावा घेतला असता सद्य:स्थितीत ३९१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत पैकी ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३१४ रुग्ण उपचारखाली आहेत. ८ जणांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी नियम पाळून काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोना रुग्णसेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नवे पारगावचे शासकीय ग्रामीण रुग्णालय, अंबप व भादोले प्राथमिक आरोग्य केंद्र अहोरात्र सेवा देत आहेत. पारगाव ग्रामीणचे अधीक्षक एम. जी. मुजावर व त्यांचे सहकारी, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र गायकवाड, आरोग्यसेवक शिवदास पिंपळे, अमृत पाटणकर, माधवी हजारे, शब्बीर देसाई, पी. जे. देशमुख, शमा सत्ती, अनुराधा पोळ, भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी माही कुंभार व त्यांचे आरोग्यसेवक अविश्रांत श्रम घेत आहेत.

चौदा गावची कोरोनाची सध्याची स्थिती अशी :

तक्ता

३० पारगाव तक्ता

Web Title: The corona grove in the western part of Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.