शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : श्री दत्त साखर शिरोळ उभारणार ऑक्सिजन प्लँट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:32 IST

Oxygen Cylinder Sugar factory Kolhapur : राज्यासह कोल्हापूर जिल्हा व कारखाना कार्यक्षेत्रातील गावामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. काही रुग्णांना अशावेळी ऑक्सिजनची तात्काळ गरज असते. मात्र, ऑक्सिजनअभावी बरेच रुग्ण अत्यावस्थ होत आहेत. ऑक्सिजन तुटवडा होवू नये म्हणून श्री दत्त साखर कारखाना शिरोळ चार आठवड्यात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करत असून दिवसाला १०० सिलेंडर ऑक्सिजन कार्यक्षेत्रातील रुग्णांना उपलब्ध होतील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देश्री दत्त साखर शिरोळ उभारणार ऑक्सिजन प्लँटरोज १०० सिलेंडर ऑक्सिजननची निर्मिती : गणपतराव पाटील

शिरोळ : राज्यासह कोल्हापूर जिल्हा व कारखाना कार्यक्षेत्रातील गावामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. काही रुग्णांना अशावेळी ऑक्सिजनची तात्काळ गरज असते. मात्र, ऑक्सिजनअभावी बरेच रुग्ण अत्यावस्थ होत आहेत. ऑक्सिजन तुटवडा होवू नये म्हणून श्री दत्त साखर कारखाना शिरोळ चार आठवड्यात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करत असून दिवसाला १०० सिलेंडर ऑक्सिजन कार्यक्षेत्रातील रुग्णांना उपलब्ध होतील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.अध्यक्ष पाटील म्हणाले, माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी कोरोनाची राज्यातील गंभीर स्थिती आणि आॅक्सिजनची गरज लक्षात घेवून साखर उद्योगातील कारखानदारांना ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँट उभारण्यासंदर्भात सुचना केल्या होत्या. दत्त साखर कारखान्याने नाशिक येथील मे साई नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी (एस.एन.सी.ई) या कंपनीस हा प्रकल्प उभारण्याचे काम दिले  आहे.

ताशी २५ मी. क्युबीक क्षमतेचा हा प्रकल्प असून लवकरच महिना अखेरीस प्रकल्प कार्यान्वित होवून दररोज १०० सिलेंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कारखाना कार्यक्षेत्र तसेच शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिलासा देणारा ठरेल. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही.पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनSugar factoryसाखर कारखानेshirol-acशिरोळkolhapurकोल्हापूर