corona cases in kolhapur : कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण अधिक, सक्रिय रुग्ण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:24 AM2021-06-10T11:24:11+5:302021-06-10T11:31:57+5:30

corona cases in kolhapur : कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा गेले काही दिवस कोरोनावर मात केलेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या घटत आहे. साडेपंधरा हजारांवरून ही संख्या आता साडेबारा हजारांवर आली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत १५१९ नवे रुग्ण नोंदवण्यात आले असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona cases in kolhapur: more corona free citizens, less active patients | corona cases in kolhapur : कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण अधिक, सक्रिय रुग्ण कमी

corona cases in kolhapur : कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण अधिक, सक्रिय रुग्ण कमी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण अधिक, सक्रिय रुग्ण कमीकाहीसा दिलासा : नवे १५१९ रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा गेले काही दिवस कोरोनावर मात केलेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या घटत आहे. साडेपंधरा हजारांवरून ही संख्या आता साडेबारा हजारांवर आली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत १५१९ नवे रुग्ण नोंदवण्यात आले असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर शहरात ४०७, करवीर तालुक्यात ३३९ तर हातकणंगले तालुक्यात ३३९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३१ मृत्यू नोंदवण्यात आले असून सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरातील असून ही संख्या नऊ आहे. त्याखालोखाल करवीर तालुक्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील मृतांची तालुकावार संख्या

  • कोल्हापूर ०९

कनाननगर, लक्षतीर्थ वसाहत, सानेगुरुजी वसाहत, संभाजीनगर, जीवबानाना पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, गंगावेश, जवाहरनगर

  • करवीर ०७

कंदलगाव, म्हाळुंगे, वाकरे, तामगाव, खुपिरे, पाचगाव, येवती

  • इचलकरंजी ०३

इचलकरंजी शहर २, आमराईमळा

  • पन्हाळा ०२

आरळे, पन्हाळा ग्रामीण

  • शिरोळ ०२

दत्तवाड, नवे दानवाड

  • गडहिंग्लज ०२

गडहिंग्लज, भडगाव

  • हातकणंगले ०२

कबनूर २

  • कागल ०१

बोरवडे

  • आजरा ०१

होन्याळी

  • इतर २

चंदूर बेळगाव, बोरिवली

Web Title: corona cases in kolhapur: more corona free citizens, less active patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.