corona cases in kolhapur : शिंदेवाडीच्या पिता-पुत्रांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 18:34 IST2021-05-05T18:33:26+5:302021-05-05T18:34:45+5:30
CoronaVirus In kolhapur : शिंदेवाडी (ता गडहिंग्लज) येथील माजी सरपंच भाऊराव दशरथ महाडिक (९४) व त्यांचे सुपुत्र माजी पोलीस पाटील मनोहर भाऊराव महाडिक (६४) या दोघांचेही एकाच दिवशी मंगळवारी( ४ मे ) कोरोनाने निधन झाले.त्यामुळे शिंदेवाडीसह पंक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

corona cases in kolhapur : शिंदेवाडीच्या पिता-पुत्रांचा कोरोनाने मृत्यू
नूल : शिंदेवाडी (ता गडहिंग्लज) येथील माजी सरपंच भाऊराव दशरथ महाडिक (९४) व त्यांचे सुपुत्र माजी पोलीस पाटील मनोहर भाऊराव महाडिक (६४) या दोघांचेही एकाच दिवशी मंगळवारी( ४ मे ) कोरोनाने निधन झाले.त्यामुळे शिंदेवाडीसह पंक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर भाऊराव हे शिंदेवाडीचे पहिले सरपंच झाले. किसान दूध संस्थेचे ते संस्थापक अध्यक्षही होते. त्यांचे एकुलते सुपुत्र मनोहर महाडिक हे गावचे पोलिस पाटील होते. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते. गडहिंग्लज तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
गेल्या आठवड्यात दोघांनाही कोरोनाची लागण झाली. भाऊराव यांच्यावर गडहिंग्लजमध्ये तर मुलगा मनोहर यांच्यावर कोल्हापूरात उपचार सुरु होते. दरम्यान,रात्री आठच्या सुमारास भाऊराव यांचा तर दहाच्या सुमारास यांचा मृत्यू झाला. मनोहर यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.